माझं प्रेम...!

गुहागर...... कीर्तनवाडी ......., India
माझी ती अशी असावी, जगात दूसरी तशी नसावी, मलाच सर्वस्व माननारी, माझी ती अशी असावी... प्रानजळ असावी, अवखळ असावी, परी ती अगदी सोज्वळ असावी, सर्वांना अगदी आपलं माननारी, माझी ती अशी असावी... फारच सुंदर, फारच गोरी, फारच देखणी पण नसावी, मजवर भरपूर प्रेम करणारी, माझी ती अशी असावी... आपली माणसं, आपलं घर, आपलेपणा जपणारी असावी, ससूलाही आई म्हणनारी, माझी ती अशी असावी... चाणाक्ष, हुशार, व्यवहारी, आयुष्यातील सल्लागार व्हावी, माझ्या चुका लक्षात घेणारी, माझी ती अशी असावी... माया, प्रेम आपुलकी, हे सर्व देणारी असावी, माझी ती कशी असावी? माझी ती अशी असावी...

लोकप्रिय पोस्ट

लोकप्रिय पोस्ट

बुधवार, १९ जानेवारी, २०११

Jai Dev Jai Dev - Navra Mazaa Navsacha



ज्या भुमीवर राजे जन्मले.......वेगात वार्‍यालासुध्दा इथे पछाडले,पण जिंकून जग आम्ही सारे हारले,या शर्यतीत घर माझे कुठे मागे राहीले,आईच्या दोन सुखाश्रुंचे मोल आज जाणले,श्रुंगार हजार करुन रुप झिजले,काडीमोलच ते जर त्या डोळ्यांस न दिसले,विरहाच्या चिंतनात तिकडे किती रुमाल भिजले,भावनांच्या बाजारी असे किती बंध निलाम झाले,या पोटासाठीचना हे सारे घडले,पण हे खळ्गे कधी ना भरले,अमानुष डाव किती काळाने खेळले,होते चारच क्षण आणि आता तेही संपले,या आकाशी जेव्हा विमान उडाले,त्या जबाबदरीच्या अजगराने आम्हा गिळाले,परतीसाठी कितींदा मग शीड बांधले,पण किनारा पहातच हे जहाज बुडाले,आठवणींच्या ओंडक्यावर नाते तरंगले,आज सह्याद्रीवरुन कोणीतरी बोलावले,स्वर्गसुख ते सारेकाही अनुभवले,पण मन माझे ना कधी इथे रमले,ध्यान पुन्हा पुन्हा आज तिथेच लागले,ज्या भुमीवर राजे जन्मले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Powered By Blogger